संस्कृत अभ्यास

संस्कृत अभ्यास


सरावाने परिपूर्णता येते आणि हेच संस्कृत अभ्यास चे मुख्य लक्ष्य आहे. संस्कृत व्याकरण परिपूर्ण करण्यात आपल्याला मदत करण्यासाठीच ही वेबसाइट तयार केली गेली आहे. संस्कृतचे विद्यार्थी येथे दिलेल्या असंख्य अभ्यासांच्या मदतीने त्यांचे व्याकरण सुधारू शकतात.

नाम
संस्कृतमध्ये नामाचे मूळ रूपाला प्रातिपदिक म्हणतात. विभक्ती, वचन, शेवटचा अक्षर आणि लिंगानुसार प्रत्येक प्रातिपदिकेतून अनेक नामे तयार होतात.

सात विभक्ति आणि तीन वचनांचे प्रत्ययांना जोडुन प्रत्येक प्रातिपदिकातून २१ रूपे बनवला जातो. त्यांना विभक्ति रूप म्हणतात. सम्बोधन विभक्ति प्रथमा विभक्तिचाच एक भाग आहे त्यामुळे त्याला पृथक नाहि मानला जातो.

अष्टधायीच्या सूत्रांवर आधारित नियमांनुसार तयार केलेल्या सूचीं आणि अभ्यासांद्वारे प्रातिपदिकातून संज्ञा निर्माण करण्यास कुशल व्हा.
क्रियापद
क्रियापद म्हणजे वाक्याच्या अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द. क्रियापदाचे मूळ रूपाला धातु म्हणतात. प्रत्येक धातुतून अनेक क्रियापद बनतात ज्याला धातुरूप म्हणतात.

संस्कृत धातु दहा गटांमध्ये वर्गीकृत आहेत. त्यांचा तीन पुरुष, तीन पद, तीन प्रयोग, तीन वचन, विभिन्न लकारां प्रमाणे रूप बनवला जातो.

अष्टधायीच्या सूत्रांवर आधारित नियमांनुसार तयार केलेल्या सूचीं आणि अभ्यासांद्वारे धातुतून क्रियापदांचा निर्माण करण्यास कुशल व्हा.
सर्वनाम
जो नाव सर्वांना किंवा कोणालाही दिला जाऊ शकतो त्या नावांना संस्कृत मध्ये सर्वनाम म्हणतात. संस्कृतमध्ये "सर्वादीनि सर्वनामानि" सूत्रानुसार सर्वनाम शब्दांचा विधान केला गेलेला आहे . या सूत्रानुसार, सर्वादिगणात विद्यमान सर्व, विश्व, उभ सारखे अनेक शब्दांना सर्वनाम म्हणतात.

नामांसारखे सर्वनामांच्या मूळ रुपाला प्रदीपिक म्हणतात. प्रत्येक सर्वनामाच्या प्रातिपदिकेच्या सुद्धा २१ रूपे बनतात.

अष्टधायीच्या सूत्रांवर आधारित नियमांनुसार तयार केलेल्या सूचीं आणि अभ्यासांद्वारे प्रातिपदिकातून सर्वनाम निर्माण करण्यास कुशल व्हा.
कृत प्रत्यय
प्रत्यय त्या शब्दावयवला म्हणतात ज्याला शब्दाच्या समाप्तीस जोडल्यावर त्या शब्दाचा अर्थ बदलतो. धातूंवर वापरले जानारे प्रत्ययांना 'कृत' प्रत्यय म्हणतात आणि त्यांना वापरून तयार केलेल्या शब्दांना 'कृदन्त' म्हणतात.

अष्टधायीच्या सूत्रांवर आधारित नियमांनुसार तयार केलेल्या सूचीं आणि अभ्यासांद्वारे धातूंवर कृत प्रत्यय वापरून कृदन्त शब्दांचा निर्माण करण्यास कुशल व्हा.
तद्धित प्रत्यय
प्रत्यय त्या शब्दावयवला म्हणतात ज्याला शब्दाच्या समाप्तीस जोडल्यावर त्या शब्दाचा अर्थ बदलतो. प्रातिपदिकांवर वापरले जानारे प्रत्ययांना 'तद्धित' प्रत्यय म्हणतात आणि त्यांना वापरून तयार केलेल्या शब्दांना 'तद्धितान्त' म्हणतात.

अष्टधायीच्या सूत्रांवर आधारित नियमांनुसार तयार केलेल्या सूचीं आणि अभ्यासांद्वारे प्रातिपदिकांवर तद्धित प्रत्यय वापरून तद्धितान्त शब्दांचा निर्माण करण्यास कुशल व्हा.
संख्या
संस्कृतमध्ये संख्या हे नामांचेच एक भाग आहे. त्यांना केवळ शिकण्याच्या सोयीसाठी स्वतंत्रपणे वर्गीकृत केले गेले आहेत.

अष्टधायीच्या सूत्रांवर आधारित नियमांनुसार तयार केलेल्या सूचीं आणि अभ्यासांद्वारे प्रातिपदिकातून संख्यांचा निर्माण शिका.